भारतासोबतच्या मतभेदांवर चर्चा करून तोडगा काढावा; चीनचा पाकला सल्ला

chin
बिजींग – संयुक्त राष्ट्र संघानंतर चीनने पाकिस्तानला असा सल्ला दिला आहे की, भारतासोबत असलेल्या मतभेदांवर आपापसात चर्चा करून आणि सल्लामसलतीने तोडगा काढावा आणि त्या बरोबरच दक्षिण आशियामध्ये शांती, स्थिरता आणि विकास अबाधित राखण्यासाठी काम करावे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता हांगलेई यांनी म्हटले आहे की, चीन भारत आणि पाकिस्तान सीमा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारामुळे १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीवर चीन लक्ष ठेवून आहे. हांगलेई यांनी असेही सांगितले की, चीनने दोन्ही देशांना संयमाने काम करण्यास सांगितले आहे. गोळीबारी बंद करून परस्परामध्ये चर्चा करून स्थिती नियंत्रणात करण्यास सांगितले आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश चीनसाठी मित्र देश आहेत, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे.