परदेशी उपक्रमांसाठी यूजीसीची परवानगी घेणे बंधनकारक

ugc
पुणे – देशातील कोणत्याही विद्यापीठाने किंवा विद्यापीठांशी संलग्न कॉलेजांनी त्यांचा परदेशातली कोणताही उपक्रम संबंधित देशातील भारतीय दूतावास किंवा उच्चायुक्तालयाला अंधारात ठेवून राबवू नये, अशी स्पष्ट सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. परदेशात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमांबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि यूजीसीची पूर्वपरवानगी घेणेही आवश्यक आहे, असे यूजीसीचे सचिव जसपाल संधू यांनी नुकतेच देशातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र लिहून कळवले आहे.

‘काही विद्यापीठांच्या अशा कृतींमुळे भारतीय विद्यापीठांची परदेशातील प्रतिमा खराब होते. इतकेच नाही, तर यामुळे देशाच्या सुरक्षेलाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे विद्यापीठांनी आणि कॉलेजांनी परदेशातील कोणत्याही उपक्रमांबाबत त्या देशातील भारतीय दूतावास किंवा उच्चायुक्तालयाला माहिती देणे बंधनकारक आहे; तसेच या उपक्रमांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि ‘यूजीसी’ची पूर्वपरवानगीही आवश्यक आहे. हे बंधन न पाळल्यास संबंधित विद्यापीठांवर कारवाई केली जाईल,’ असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment