नेपाळमधील हिमवादळ आणि हिमस्खलन २९ जण ठार

landslide
नेपाळ – नेपाळमध्ये हिमवादळ आणि हिमस्खलनाने २६ ट्रॅकर्ससह तीन शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त अन्नपूर्णा सर्किट परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. तसेच इसराइल व पोलंडच्या दोन-दोन नागरिकांचा आणि नेपाळमधील आठ नागरिकांचा देखील समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील खराब हवामाने नेपाळमध्ये भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाली आहे. पूर्व आणि पश्चिम भागात हिमस्खलनाने १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये स्थानीक नागरिकांव्यतीरिक्त कॅनडा, स्लोवाकिया आणि काही भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे. मुसळधार पावसामुळे गंडकी नदीत वाहून फ्रांन्समधील एका नागरिक मृत्यू झाला आहे. भारतातील हुदहुद चक्रीवादळाचा प्रभाव नेपाळमध्येही दिसून आला आहे.

Leave a Comment