नाशिक कारागृहात कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंचा मेळावा

jail
नाशिक – नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी स्वतः अनेक वस्तू तयार करतात. त्यावस्तू तयार करणाऱ्या हातांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता यंदा दिवाळीनिमित्त कारागृहाच्यावतीने खास मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळात कैद्यांची बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटना जिल्हा मुख्य न्यायाधीश आनंद करंजकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

या मेळ्यात महिलांसाठी जरदोसी वर्क केलेल्या साड्या, टिकलीकाम केलेल्या साड्या, सेमी पैठणी, टॉवेल, सतरंजी, देवाचे आसन, चावी ठेवण्यासाठी भिंतीवरील होल्डर, टेबल, खुर्चा, बसण्यासाठी छोटी टेबल्सचा समावेश आहे. तसेच पुरुषांसाठी मजबूत शूज तयार करण्यात आले आहे. इतरही अनेक जीवनावश्यक वस्तू तयार करण्यात आल्या आहेत या वस्तूच्या विक्रीतून मिळणारा निधी हा कैद्यांना मिळणार आहे. कारागृहातील वस्तूंचा दर्जा चांगला आणि किंमत कमी असल्याने या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. दिवाळी मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेले सागवान लाकडाचे देव्हारे, साबण, उटणे, पणत्या या एक तासात संपल्या. त्यामुळे मेळाव्यासाठी येणाऱ्या नागरिकांना काही काळ वाट पहावी लागली. दिवाळीसाठी तयार करण्यात आलेल्या वस्तू या उच्च प्रतीच्या असून ग्राहकांचा खरेदीला अभुतपूर्व प्रतिसाद आहे. नागरिकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन तुरूंग अधीक्षक जयंत नाईक यांनी केले आहे.

Leave a Comment