धनत्रयोदशीपूर्वीच सोन्याने ओलांडला २७ हजारांचा टप्पा

gold
नवी दिल्ली – व्यापारी आणि सोने खरेदी करणा-या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा सण येत्या २१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सणासुदीच्या काळात ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी दागिने बनवणारे आणि छोट्या व्यापा-यांच्या बोलीमुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव ७० रुपयांच्या तेजीसह ‍एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर म्हणजे प्रति १० ग्रॅमचा भाव २७,६५० रुपयांवर पोहोचला. तर औद्योगिक एककांप्रमाणे आणि नाणी निर्मार्त्यांच्या कमी मागणीमुळे चांदीचे भाव २०० रुपयांनी घसरून प्रति किलोचे भाव ३८,८०० रुपयांवर पोहोचले. सिंगापूरमध्ये सोन्याचे भाव ०.७ टक्क्यांनी घसरून १,२२३.९५ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. दिल्लीमध्ये ९९.९ आणि ९९.५ शुद्ध सोन्याचे भाव ७० रुपयांच्या तेजीसह प्रति १० ग्रॅमचा भाव २७,६५० आणि २७,४५० रुपयांवर बंद झाला. लिलावातील दबाव पहाता तयार चांदीचा भाव २०० रुपयांनी घसरून प्रति किलोला ३८,८०० रुपये बंद झाले.

Leave a Comment