एनर्जी ड्रिंक्सवर ‘डब्ल्यूएचओ’ने घातली बंदी

who
लंडन – सध्या युवापिढीमध्ये बॉडी बिल्डिंग आणि शरीराला उत्साही ठेवण्यासाठी एनर्जी ड्रिंक्सचे प्रचंड क्रेझ आहे. मात्र, या ड्रिंक्सला डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातली आहे. आजची तरुणपिढी उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे अशा ड्रिंक्समुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशा इशारा हू ने दिला आहे. या एनर्जी ड्रिंक्समधील कॅफिनच्या मोठे प्रमाण धोक्याचे ठरत आहे. कॅफिनचे अतिप्रमाण असलेले एनर्जी ड्रिंक्स घेतल्याने हायपरटेन्शन आणि हार्टफेल्यूअरचा धोका राहतो.

जगातील पहिले एनर्जी ड्रिंक्स १९६० साली जपानमध्ये तयार करण्यात आले. त्यानंतर परदेशासह भारतातही याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशाचे भविष्य असलेल्या युवावर्गाला वाचविण्यासाठी एनर्जी ड्रिंक्सचे उत्पादन आणि विक्रीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. काही काळासाठी तंदुरूस्त वाढले तरी आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा एनर्जी ड्रिंक्सवर आरोग्य संघटनेने बंदी घातली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment