शिओमी रेडिमी १ एस पुन्हा आऊट ऑफ स्टॉक

xiomi
चिनी स्मार्टफोन शिओमी रेडिमी वन एस सलग सातव्यांदा आऊट ऑफ स्टॉक झाला असून एकप्रकारे हा विक्रमच मानला जात आहे. भारतात बिग बिलीयन सेल्ससह सातवेळा हा फोन फ्लीपकार्टवर विक्रीसाठी आला आणि प्रत्येकवेळी तो कांही सेकंदांच्या अवधीत विकला गेला. आत्ता शीओमीने १ लाख हँडसेट फ्लॅश सेलसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध करून दिले होते. रेडिमीचे भारतात आत्तापर्यंत ४ लाख ९० हजार हेँडसेट विकले गेले आहेत.

६ आक्टोबरच्या बिग बिलीयन सेलसाठी शिओमी रेडिमी १एस चे ३ लाख ९० हजार हँडसेट विकले गेले असून या फोनची किंमत आहे ५९९९ रूपये. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन खूपच लोकप्रिय ठरला आहे. ४.७६ इंची स्क्रीन,१६ जीबी इंटरनल मेमरी, ८ एमपीचा रियर कॅमेरा, १.६ एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड जेलीबिन ४.३ची ऑपरेटिंग सिस्टीम अशी या स्मार्टफोनची फिचर आहेत.