हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल अॅमेझॉन वादाच्या भोवर्‍यात

legin
दिल्ली- हिंदू देवदेवतांची चित्रे असलेल्या महिलांनी घालावयाच्या लेगिन ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याने ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या लेगिनमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत व त्यामुळे कंपनीने माफी मागून हे उत्पादन ताबडतोब बाजारातून काढून घ्यावे अशी मागणी हिंदू संघटना युनिव्हर्सल सोसायटी ऑफ हिदुइझमचे अध्यक्ष राजन जेड यांनी नेवाडा अमेरिका येथून केली आहे.

hindu

मिळालेल्या माहितीनुसार यिझम ब्रँड ने या लेगिन तयार केल्या आहेत. त्यावर गणेश, शिव, ब्रह्मा, हनुमान, राम, राधाकृष्ण यांची चित्रे आहेत. या लेगिन ३ हजार रूपयांपासून विकल्या जात आहेत. हिंदू संघटनेने हिंदू देवदेवता मंदिरात , घराघरात पुजल्या जातात असे सांगतानाच कपड्यांच्या पायावर अथवा शरीराच्या मागच्या भागावर अशी चित्रे छापणे हा हिंदुत्वाचा अपमान असल्याचे पत्रक जारी केले आहे. कंपनीने माफी न मागितल्यास व या उत्पादनांची विक्री त्वरीत न थांबविल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

Leave a Comment