मतदार राजाला माझा पेपरचे मतदानाचे आवाहन

voters
पुणे – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होऊन तीन तास उलटून गेल्यानंतरही फारसा उत्साह जाणवत नसल्याचेच चित्र दिसत असल्यामुळे राज्यातील सर्वच मतदारांना माझा पेपर मतदानाचे आवाहन करत आहे.

मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदान यादीत असणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र तुमच्याकडे नसेल, तरीही घाबरू जाऊ नका. कारण तरीही तुम्हाला मतदान करता येईल. अशी सोय करून देण्यात आली आहे.

यंदा निवडणूक आयोगाने यंदा मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी शक्कल लढवली आहे. तुमच्याकडे अधिकृत असे कोणतही ओळखपत्राला परवानगी देण्यात आली आहे.

मतदान ओळखपत्र नसेल तरी खालीलपैकी एक ओळखपत्र असल्यास मतदान करता येणे शक्य होणार आहे…
पासपोर्ट, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅनकार्ड, आधारकार्ड, राज्य सरकारी कर्मचारी ओळखपत्र, केंद्र सरकारी कर्मचारी ओळखपत्र, फोटो असलेलं बँक पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा योजना स्मार्ट कार्ड, सेवा निवृत्त ओळखपत्र, निवडणूक आयोगाकडून मिळालेली फोटो वोटर स्लिप

Leave a Comment