फ्लाइंग रोबोला नांव सुचवा- १ हजार डॉलर्स जिंका

nasa
यूएस स्पेस एजन्सी नासाने त्यांच्या नवीन फ्री फ्लाईंग रोबोला २०१७ सालात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठविण्याची तयारी चालविली आहे. मात्र त्याचवेळी या रोबोला काय नांव द्यावे असा प्रश्न पडल्याने त्यांनी नागरिकांकडूनच या रोबोसाठी नांव सूचवावे असे आंवाहन केले असून जे नांव पसंतीस उतरेल ते सुचविणार्‍यास १ हजार डॉलर्सचे इनाम जाहीर केले आहे.या स्पर्धेतील दुसर्‍या क्रमांकासाठी ५०० डॉलर्स तर तिसर्‍या व चौथ्या क्रमांकासाठी २५० डॉलर्स दिले जाणार आहेत.

नासाच्या अॅडव्हान्स एक्स्प्लोरेशन सिस्टीम डिव्हीजनचे पमुख जॅसन क्रूसन या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की असे फ्री फ्लाईंग रोबो अंतराळ स्टेशनात आहेतच त्यांच्या टीममध्ये हा नवीन रोबो दाखल होणार आहे. मात्र फ्री फ्लाईंग रोबो हे नांव बोअरिंग असल्याने नवे नांव सुचविले जावे यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे. हे रोबो अंतराळ संशोधन व शोधात अंतराळवीरांची क्षमता अनेक पटींनी वाढवितात कारण ते कुठल्याही वेळी, कुठल्याही वातावरणात आणि कितीही वेळ सोपविलेले काम करू शकतात.

नांव सुचविण्यासाठी स्पर्धकांनी टॉपकोडर कंपनीच्या स्पेस डॉट कॉम या वेबसाईटवर नोंदणी करून नांवे सुचवायची आहेत.

Leave a Comment