टाईम मॅक्झीनच्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये मलाला, साशा, सालिया आणि जोशुआ

malala
न्यूयॉर्क – नोबेल शांती पुरस्कार विजेता मलाला युसूफजई, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या मुली आणि हॉंगकॉंगमध्ये चीनविरोधी आंदोलनाचा नेता जोशुआ वोंग यांचा समावेश जगातील २५ प्रभावशाली तरुणांमध्ये करण्यात आला आहे. टाईक नियतकालिकाने २५ प्रभावशाली तरुणांची यादी तयार केली आहे. त्यात मलाला आणि इतर युवकांचा समावेश करण्यात आला आहे. १७ वर्षीय मलाला हिला भारताचे कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत संयुक्तपणे नुकतेच नोबेल शांती पदक मिळाले आहे. टाईम नियतकालिकाने म्हटले आहे की, आजच्या काळात तरुणांचा समाजावरील प्रभाव नाकारता येणार नाही. त्यांचे ट्विटर आणि समूह संपर्क माध्यमात अनेक प्रशंसक आहेत. दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमात केंद्रस्थानी अनेक तरुण आहेत किंवा लोकशाहीच्या आंदोलनासारख्या लढ्यांचे ते नेतृत्व करत आहेत. या यादीमध्ये पेनसिल्वानिया येथील बेसबॉलपटू मोने डेविस, बराक ओबामा यांच्या कन्या १३ वर्षीय साशा आणि १६ वर्षीय सालिया यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. हॉंगकॉंग येथील प्रदर्शनांचा नेता असलेला १८ वर्षीय वोंग याचा देखील यात समावेश आहे.

Leave a Comment