चीनमध्ये रोज वाया जाते आहे २० कोटी लोकांचे जेवण

food-waste
पेइचिंग – चीनमध्ये दरवर्षी २० कोटी नागरिकांचे पोट भरु शकेल इतक्या ३२. ०६ अब्ज जेवणाचे नुकसान केले जात आहे. वाहतुक आणि गोदामात साठवणूकीच्या दरम्यान दरवर्षी ३५ अब्ज किलो धान्य इकडे तिकडे केले जाते. चीनच्या अन्न विभाग प्रशासनाचे उप निदेशक वू जिदान यांनी सांगितले की, पाणी आणि कृषी संसाधनांपेक्षा जास्त खर्च भोजनावर केला जात आहे. चीनमध्ये जेवणाच्या टेबलावर २०० अब्ज युवान इतके जेवण वाया जाते. जिदान यांनी सांगितले की, नुकसान झालेल्या अन्नाने २० कोटी हून अधिक नागरिकांचे पोट भरले जाऊ शकते. तसेच जेवणाची होणारी नासाडी रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.

Leave a Comment