कोणीच तयार नसल्याने क्रिकेट कर्णधार झालो; अनिल कुंबळेची कबुली

anil-kumble
पणजी – भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणा-या अनिल कुंबळे यांनी म्हटले आहे की, त्याने संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. कारण ते पद घेण्यासाठी कोणीच इच्छुक नव्हते. नोव्हेंबर २००७ मध्ये कुंबळे भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले. त्यानंतर वर्षभर त्याने संघाचे नेतृत्व केले. त्याने म्हटले आहे की, १७ वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर आपण चूकीमुळे कर्णधार झालो आणि ही जबाबदारी घेण्याची आपली तयारी नव्हती. त्याने म्हटले आहे की, राहुल द्रविडने कर्णधारपद सोडले होते आणि महेंद्र धोनीला कसोटी कर्णधारपद देणे घाईचे ठरले असते. सचिन तेंडुलकर याची कर्णधार होण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे एकमेव आपले नाव या पदासाठी शिल्लक राहिले होते. एका कार्यक्रमात बोलतांना कुंबळे म्हणाला की, मला माहित होते की मी फार काळ या पदावर राहू शकत नाही. कारण माझ्या संघात माजी कर्णधार आणि एकदिवसीय कर्णधार खेळत होते. आपण आपल्या कार्यकाळात नेहमी सर्वसमावेशक निर्णय घेतले आणि सहजपणे मैत्रीपूर्ण संबंधातून जबाबदारीचा निर्वाह केला.

Leave a Comment