इंचियोन पदक विजेत्यांचा मोदींनी केला गौरव

modi
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी इंचियोन आशियार्इ खेळातील पदक विजेत्या खेळाडूंना आज चहा पानासाठी आमंत्रित करून सांगितेल की, राजकीय नेत्यांएवढेच खेळाडूंचे देखील देशासाठी योगदान आहे. मोदी म्हणाले की, खेळाडूंना देखील ते आपला मित्र समजतात आणि स्वच्छ भारत अभियानात मेराकोम, सचिन तेंडुलकर यांनी झाडू हातात घेताना लोकांनी पाहिले तेव्हा आपल्या पेक्षा देखील जास्त लोक त्यांच्या झाडू घेण्याने प्रभावित झाले आहेत. या चहापानानंतर ट्विटरवरून मोदींनी म्हटले आहे की, पदक विजेत्या खेळाडूंशी चांगली चर्चा झाली. खरोखरच ते देशाला अभिमान वाटावे असे आहेत. यावेळी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल हजर होते. ११ सुवर्ण पदकांसह ५७ पदके मिळवून ८ व्या क्रमांकावर राहिला आहे.

मोदी यांनी खेळाडूंचे कौतूक करून अपेक्षा व्यक्त केली की, त्यांच्यातील ऊर्जा आणि उत्साह देशाकरिता चांगल्या कामी येर्इल. मंगळ अभियान शास्त्रज्ञांनी यशस्वी केल्याचे उदाहरण देऊन मोदी म्हणाले की, प्रत्येक खेळाडूच्या उपलब्धीमुळे देखील देशाचा तसाच सन्मान आणि गौरव होत असतो. तेथे उपस्थिती खेळाडूंना त्यांनी व्यक्तीश: संपर्कात राहून सल्ला आणि खास बातचीत करण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली. खेळाडूंनी आपले वर्तन स्वच्छ ठेवावे असे सांगताना ते म्हणालो की, त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे देशाचे नाव कलंकीत होऊ शकते. मेरीकोम हिने खेळाडूंच्यावतीने मोदींचे आभार मानले. क्रीडामंत्री सोनोवाल म्हणाले की, पंतप्रधान खेळाडूंच्या बाबत नेहमी विचारपूस करत राहतात आणि २०१६ च्या ऑलंपिकसाठी ते आत्तापासून आग्रही आहेत. चीन, जपान, कोरिया, कजाकिस्तान जर आघाडीवर आहेत, तर आम्ही मागे का आहोत? असे ते नेहमी विचारतात असे सोनोवाल म्हणाले. ते पुढे म्हणाले की, खेळाडूंना सर्व त्या सुविधा देण्यास सरकार मागे हटणार नाही.

Leave a Comment