आयसीसीने केलेल्या कारवार्इचे मॅक्सवेलने केले स्वागत

maxwell
शारजाह – अवैध गोलंदाजी विरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने केलेल्या कारवार्इबाबत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आनंद व्यक्त केला आहे. मॅक्सवेलने सांगितले की, या कारवार्इत थोडा उशीर झाला आहे. मात्र, आता क्रिकेटमध्ये पारंपारिक फिरकी गोलंदाज पहायला मिळतील आणि त्यामुळे मैदानावर चेंडू आणि बॅट यांच्यात समतोल वाढेल. संकेतस्थळ पाकपैशन डॉट नेटवर मॅक्सवेलने सांगितले की, मला आनंद आहे की, त्यांनी कमीत कमी कारवार्इला सुरुवात केली. असे असूनही, माझे मत आहे की, त्याच्यात थोडा उशीर झाला आहे. महत्वाचे म्हणजे आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबसाठी फलंदाज म्हणून आपली क्षमता सिद्ध केलेल्या मॅक्सवेलने नुकतीच पाकिस्तानविरुद्ध आपल्या फिरकी गोलंदाजीची देखील जादू दाखविली होती. पाकिस्तान विरूद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्याच्या अखेरच्या षटकात मॅक्सवेलने एकही धाव न देता दोन गडी टिपले आणि पाकिस्तानला पराभूत केले. विशेष म्हणजे पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी केवळ दोन धावा पाहिजे होत्या. मॅक्सवेलने सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता आम्ही अधिक पारंपारिक फिरकी गोलंदाजांना बघू शकतो. माझ्या मते, हे क्रिकेटसाठी चांगले आहे. तसेच यामुळे मैदानावर समतोल निर्माण होर्इल, असेही तो पुढे म्हणाला.

Leave a Comment