अंध मतदारांसाठी ईव्हीएम मशिनवर ब्रेल लिपीतील बटणांची सुविधा

election
मुंबई – जागतिक अंध दिनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या मतदानात भाग घेणा-या अंध मतदारांसाठी ईव्हीएम मशीनच्या बाहेर पिवळ्या रंगाची ब्रेललिपीतील स्टिकरची पट्टी होती. अंध मतदारांनी त्या पट्टीवर हात फिरवल्यानंतर त्यांना मशीनवर कोणत्या नंबरवर कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत याची माहिती होऊन त्यानंतर ते मतदान करत. यामध्ये बराच वेळ जात होता. मात्र यावेळी उत्तरप्रदेशमधून आलेल्या नवीन मशीनमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. मशीनमध्येच ब्रेलची सुविधा असल्याने अंध उमेदवारांना थेट मशीनमध्येच उमेदवार तपासून मतदान करता आले. अंध मतदारांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनवरच ब्रेल लिपीतील बटणांची सुविधा देऊ केली आहे. यामुळे अंध मतदारांना मतदान करणे सोपे झाले. या सुविधेचे अंधांच्या संघटनेने स्वागत केले असले तरी हेडफोनचा वापर करून एखादी आवाज येणारी यंत्रणा निवडणूक विभागाने निर्माण केली. तर त्याचा खरा फायदा आपल्याला होणार असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. यापूर्वी ठाणे जिल्ह्यात किती मतदार आहेत. त्यामध्ये स्त्री आणि पुरुष मतदार किती आहेत याची अचूक माहिती निवडणूक विभागाकडे असली तरी, अंध मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत याची कोणतीच माहिती नाही.

Leave a Comment