एम्स उभारणीपूर्वी मेडिकलला २०० कोटींची गरज

aiims
नागपूर – उपराजधानीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारणीचा निर्णय झाला. मेडिकलच्या टीजी वॉर्डसह डॉक्टरांची निवासस्थाने (अजनी) असलेला भूखंड, सिंचन विभागाची जागा, जेलनजीकची जागा निश्चित झाली. आता टीबी वॉर्ड परिसरातील कर्मचार्‍यांची निवासी गाळ्यांसहित विविध विभाग नव्याने उभारण्याची गरज आहे. यासाठी सुमारे दोनशेवर कोटींचा निधी खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी तसेच एम्ससंदर्भात पुढील प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे मेडिकलला भेट देणार आहेत.

दरम्यान, वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे नागपुरात आले होते. पुन्हा एम्स उभारणीतील अडचणींवर चर्चा करण्यासाठी १७ ऑक्टोबरला डॉ. शिनगारे येत आहेत. एम्सच्या उभारणीपूर्वी टीबी वॉर्ड परिसरातील मेडिकल, सुपरच्या कर्मचार्‍यांचे निवासी गाळे, अजनीतील डॉक्टरांचे बंगले तोडण्यासाठी तसेच बहुमजली गाळे, डॉक्टरांसाठी प्रशस्त अशी निवासस्थाने आणि त्वचारोग विभागासह वॉर्ड, एचआयव्ही विभागासह नवीन वॉर्ड बांधण्यासाठी सुमारे २०० कोटींची गरज आहे.

Leave a Comment