स्वित्झलॅंडला जाणार भारतीय शिष्टमंडळ

black-money
नवी दिल्ली – स्विस बॅंकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार उच्चस्तरीय प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ स्वित्झलॅंडला पाठविण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांकडून समजते. सदर मंडळ जेनेवातील एचएसबीसी बँकेत जाणार असून, तेथील ७०० भारतीयांच्या बॅंक खात्याचा तपशील तपासणार आहे. महसूल सचिव शक्तिकांता दास यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ स्वित्झलॅंडला जाणार असून, तेथील अर्थ मंत्रालयातील अधिका-यांसोबत बैठकदेखील करणार आहे. या प्रतिनिधी मंडळात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे अध्य़क्ष के.वी.चौधरी आणि फॉरेन टॅक्सेशन अँड टॅक्स रिसर्चचे संय़ुक्त सचिव अखिलेश रंजन यांचा समावेश आहे. सदर मंडळ १५ ऑक्टोबर रोजी जेनेवातील स्विस अधिका-यांसोबत बैठक कऱणार आहे आणि एचएसबीसीतील ७०० भारतीयांच्या खात्यांचा तपशील पाहणार आहे. याशिवाय ज्य़ा भारतीयांची स्वित्झलॅंडमधील बँकेत खाती आहेत, त्यांचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे.

Leave a Comment