रेल्वेच्या मालवाहतूकीमध्ये ४२० टक्क्यांची वाढ

train
नवी दिल्ली – एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत मालवाहतूकीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे भारतीय रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत देशात रेल्वमार्फत करण्यात आलेल्या मालवाहतुकीत ४.२० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून या कालावधीत रेल्वेतर्फे ५३२.४४ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत रेल्वेने ५११ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात रेल्वमार्फत करण्यात आलेल्या मालवाहतूकीचा विचार केला असता रेल्वने या काळात ८६.७१ मेट्रिक टन मालाची वाहतूक केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात या मालवाहतूकीत १.८५ मेट्रिक टन किंवा २.१८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात रेल्वेने ८४.८६ मेट्रिक टन मालाची वाहतूक केली होती.

Leave a Comment