रुपया घसरला, सोने-चांदी वधारले

share
मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय चलन असलेल्या रुपयामध्ये आज मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया ३१ पैशांनी घसरल्याने दिवसअखेरीस रुपयाचा विनिमय दर प्रति डॉलर ६१.४१ रुपये इतका पाहायला मिळाला. गेल्या आठवड्याभरातील रुपयाची ही निच्चांकी कामगिरी आहे. बॅंकांकडून तसेच निर्यातदारांकडून मोठ्या प्रमाणावर डॉलरची ताजी मागणी नोंदविण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्याचा फटका आज रुपयाला बसला. दरम्यान, मुंबई सराफा बाजारात आज सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये मात्र तेजी पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात २५ रुपयांची वाढ झाल्याने प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना २७,१०० रुपये मोजावे लागत होते. तर चांदीच्या दरात देखील २०० रुपयांची वाढ झाल्याने प्रति किलो चांदीचा दर ३९,४०० रुपयांवर जाऊन पोहोचला.

Leave a Comment