मलालाच्या नोबल पुरस्कार वितरणाला शरीफ जाणार नाहीत

malala
इस्लामाबाद- ऑस्लो येथे १० डिसेंबर रोजी होणार्‍या नोबेल पुरस्कार वितरण कार्यक्रमात पाकिस्तानच्या मलाला युसुफझाईलाही पूरस्कार दिला जाणार आहे मात्र या समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ जाणार नसल्याचे पाकच्या परराष्ट्र विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी भारताचे बालअधिकारांसाठी कार्यरत असलेले कैलास सत्यार्थी आणि मुलींच्या शिक्षणासाठी झटणारी पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांची संयुक्त निवड झाली आहे.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना नोबेल समितीने आमंत्रण दिले आहे. मात्र याच दरम्यान शरीफ चीनच्या दौर्‍यावर जाणार असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत असे पाकच्या परराष्ट्र व्यवहार व राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सल्लागार सरताज अझीझ यांनी स्पष्ट केले आहे. मलाला हिला नोबेल जाहीर झाल्यानंतर पाक तालिबान्यांनी त्याचा निषेध केला आहे.

Leave a Comment