मतदानापूर्वीच राजकीय बेरीज वजाबाक्या सुरू

aghadi
मुंबई -महाराष्ट्रात विधानसभांसाठी उद्या मतदान होत आहे मात्र त्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी बेरजा वजाबाक्या करण्याची सुरवात केली असून काँग्रेसने त्यात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.या निवडणुकांबाबत आलेले सर्वेक्षणाचे निकाल पाहता कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही असे दिसते. त्यामुळे कांहीही करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांची महाआघाडी करण्याच्या हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. काँग्रेसला आपला राजकीय पाया कायम राखण्यासाठी झगडावे लागणार आहे व त्यातूनच सेना राष्टवादी एकत्र सरकार स्थापण्याच्या परिस्थितीत आले तर बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसने चालविली असल्याचे समजते.

मराठी अस्मितेच्या नावाखाली सेना व राष्ट्रवादी व मनसेला एकत्र आणून बाहेरून पाठिबा देणे, काँग्रेस राष्ट्रवादीला समाधानकारक जागा मिळाल्या तर आघाडी करून सरकार स्थापणे अथवा राष्ट्रवादी, सेना व मनसे यांचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापणे अशा सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचे जोरदार प्रयत्नही केले जात आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी त्यांच्या प्रचार भाषणातून सेनेची केलेली स्तुती आणि लोकसभेतील भाजप विजय सेनेमुळेच शक्य झाल्याचा दावा ही याच डावपेचाच भाग असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment