बीसीसीआयकडून गावस्कर-शास्त्री यांना ६ कोटींचे वार्षिक मानधन

combo2
नवी दिल्ली – बीसीसीआयकडून सर्वात जास्त मानधन घेण्यात भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि रवि शास्त्री यांनी महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे. धोनी फ्रोर्ब्सच्या सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानी असला तरी, बीसीसीआयकडून मानधन घेण्यात गावस्कर आणि शास्त्री अव्वल स्थानावर आहेत. एका अहवालानुसार, शास्त्री आणि गावस्कर हे दोघेही बीसीसीआयकडून वर्षात ६ कोटी रूपये मानधन घेतात. शास्त्री सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या संचालक पदावर आहेत. तर, गावस्कर आयपीएल ऑपरेशन्सचे प्रमुख आहेत. या नव्या जबाबदारीसाठी हे दोन्ही माजी खेळाडूंना दोन कोटी रूपये मिळतात. विशेष म्हणजे, बीसीसीआयने शास्त्री आणि गावस्कर या दोघांसोबत ४ कोटी रूपयांचा वार्षिक करार केला आहे. त्याशिवाय गावस्कर-शास्त्री भारताच्या सर्व सामन्यात समालोचन करतात. बीसीसीआयच्या मानधनाच्या स्वरूपात धोनीला मागील ३५ सामन्यात खेळण्यासाठी २ कोटी ५९ लाख आणि विराट कोहलीला ३९ सामने खेळण्यासाठी २ कोटी ७५ लाख रूपये मिळाले आहेत. बीसीसीआयच्या एका अधिका-यांच्या मते, गावस्कर आणि शास्त्री यांना बीसीसीआयसाठी समालोचन करण्यास ४ कोटी रूपये दिले जातात. आयपीएलची जबाबदारी सांभाळण्यासाठी गावस्कर यांना जवळपास २ कोटी ३७ लाख रूपये देण्यात आले. शास्त्री यांना देखील हेच मानधन बीसीसीआय देते.

Leave a Comment