फेसबुकच्या सहाय्याने मोफत पैसे पाठवा – कोटक महिंद्र ची योजना

kotak
खासगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्राने फेसबुकच्या माध्यमातून कुठेही मोफत पैसे पाठविण्याची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.यामुळे कुणालाही कुठूनही आपले मित्र नातेवाईक अथवा अन्य कुणाला त्वरीत पैसे पाठविणे शक्य होणार आहे. बँकेचे उपाध्यक्ष व डिजिटल विभाग प्रमुख दीपक शर्मा यांनी ही माहिती दिली.

या विषयी सविस्तर माहिती देताना शर्मा म्हणाले की ही सेवा घेण्यासाठी युजर आमचा खातेधारक असलाच पाहिजे असे बंधन नाही. म्हणजेच पैसे पाठविणारा अथवा स्वीकारणारा आमचा खातेदार नसला तरीही ही सेवा घेऊ शकेल. यासाठी नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या आयएमपीएस प्लॅटफॉर्मचा उपयोग केला जाणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने सध्या युजर मोबाईलच्या सहाय्याने पैसे पाठवू शकतात. आयएमपीएस मध्ये सध्या २८ बँका जोडल्या गेल्या आहेत. पैसे पाठविणारा या कोणत्याही बॅकेचा खातेधारक असेल तर फेसबुकच्या सहाय्याने पैसे पाठवू शकणार आहे.

अर्थात यासाठी खास सुरू केल्या गेलेल्या केपे या वेबसाईटवर युजरला नोंदणी करावी लागणार आहे. त्यात युजरला स्वतःची माहिती व बँकेचा एमएमआयडी खाते माहिती भरावी लागेल. एकदा नोंदणी केली पैसे पाठविणे शक्य होणार आहे.पैसे स्विकारणार्‍यांनाही केपे नोंदणी केलेली असेल तर ही देवघेव त्वरीत होणार आहे. ही सर्व प्रणाली अतिशय सुरक्षित असल्यानेही शर्मा यांनी नमूद केले.

Leave a Comment