फुटबॉल खेळाचे स्वरूप बदलून टाकेल आयएसएल – तेंडूलकर

sachin
गुवाहाटी – इंडियन सुपर लिगची (आयएसएल) चांगली सुरुवात झाली आहे आणि अशी चांगल्या आरंभामुळे देशात फुटबॉंलचे स्वरूप बदलण्यास खूप फायदा होईल, असे मत भारतरत्न आणि आयएसएल फेंजायजीतील केरळ ब्लास्टर्स एफसीचे सह मालक सचिन तेंडूलकर याने व्यक्त केले आहे. केरळ ब्लास्टर्स संघाला प्रोत्साहन देण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या सचिनने म्हटले आहे की, आयएसएलची नव्याने चांगली सुरुवात झाली आहे. यामध्ये सहभागी झालेल्या संघांनी चांगली कामगिरी दाखवली आणि चाहत्यांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच यापुढे आयएसएल भारतीय फुटबॉलचे स्वरूप बदलून टाकेल. भारतीय फुटबॉलसाठी हा फार मोठा क्षण असून यातूनच फुटबॉल खेळाला चांगले दिवस येतील. या खेळाचा एक हिस्सा असल्याचा मला फार आनंद होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाने याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे तेंडूलकर म्हणाला.

Leave a Comment