दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा

fashi
बीजिंग – मागील वर्षी जुलैमध्ये शिनझियांग शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चीनच्या एका न्यायालयाने २७ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या हल्ल्यात १०० हून अधिक निरपराधी व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर १२ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर, अन्य १५ जणांच्या शिक्षेबाबतचा निकाल गेल्या दोन वर्ष प्रलंबित ठेवण्यात आला होता. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, इंटरमीडिएट पीपुल्स ऑफ कोर्टाने या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जेणेकरून अन्य २० जणांना चार ते वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली होती. २७ जुलैला पोलीस स्टेशन आणि सरकारी कार्यालयावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात ३७ निरपराधी नागरिक आणि ५९ कुख्यात दहशतवादी ठार झाले होते. तर अन्य १३ जण गंभीर जखमी झाले होते.

Leave a Comment