उर्वरित वनडे, एकमेव टी-२० साठी टीम इंडियात अक्षर पटेल समावेश

akshar-patel
नवी दिल्ली – टीम इंडियात वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी व एकमेव टी-२० साठी स्पिनर अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दुखापतग्रस्त मोहित शर्माच्या जागी संधी देण्यात आलेल्या इशांत शर्माला संघात कायम ठेवण्यात आले आहे.

पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सध्या भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. हुडहुड वादळामुळे विशाखापट्टणम येथे होणारा तिसरा एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला आहे. या दोन्ही संघादरम्यान १७ ऑक्टोबरला पुढील सामना रंगणार आहे.

टी-२० संघासाठी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणा-या मनिष पांडेची निवड करण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना मनिषने १६ सामन्यात ३०.८४ च्या सरासरीने ४०१ धावा केल्या होत्या. तसेच किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणा-या ईश्वर पटेलची टी-२० संघात निवड करण्यात आली आहे. ईश्वरने १७ सामन्यांमध्ये २३.८३ च्या सरासरीने १७ विकेट घेतल्या होत्या.

धवल कुलकर्णी आणि अंबाती रायडू यांच्या जागी मनिष पांडे आणि ईश्वर पटेलला संघात संधी देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरला कटक येथे या दोन्ही संघादरम्यान एकमेव टी-२० सामना खेळवला जाणार आहे.

Leave a Comment