उच्च न्यायालयाकडून कलानीची जन्मठेप कायम

pappu
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाकडून उल्हासनगर येथील इंदर भटीजा हत्त्येप्रकरणातील दोषी माजी आमदार पप्पू कलानी यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

कलानी यांना कल्याण सत्र न्यायालयाने भटीजा हत्त्येप्रकरणात दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात कलानी यांनी आव्हान दिले होते. त्यावर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने कलानी यांची याचिका फेटाळून लावत कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

१९९० मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर घनश्याम भटीजा यांची गोळया घालून हत्त्या करण्यात आली होती. ही हत्त्या पप्पू कलानी यांनीच केल्याचा आरोप घनश्याम यांचे बंधू व घटनेचे साक्षीदार इंदर भटीजा यांनी केला होता. त्यानंतर इंदर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. 28 एप्रिल 1990 ला कामावर जात असताना अंगरक्षकाची बंदूक हिसकावून घेत इंदर यांची गोळया घालून हत्त्या करण्यात आली होती.

Leave a Comment