अमेरिकेमधील इबोला लागण झालेल्या परिचारिकेची प्रकृती स्थिर

ebola
वॉशिंग्टन – अमेरिकेतील इबोला लागण झालेल्या परिचारिका नीना फाम यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्या डलास परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यूएस सेंटर फॉर डीजीज कंट्रोल एँड प्रीवेंशनचे प्रमुख फ्रिडेन यांनी सांगितले होते की, अमेरिकेतील इबोलाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाच्या थॉमस एरिक डंकन यांच्या आरोग्याची देखरेख करणा-या कर्मचा-यांनाही ही लागण होऊ शकते. फ्रिडेन पुढे म्हणाले होते की, रोगाची लागण थांबवण्यासाठी आखण्यात आलेल्या उपययोजनांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. इबोला रुग्णाच्या प्रकृतीची देखरेख करणे फार कठीण झाले आहे. सध्या याची लागण होऊ नये म्हणून उपाययोजनांत आणखीन गती आणण्यासाठी उपक्रम सुरु आहेत. फाम २६ वर्षांच्या असून उपचारासाठी त्यांना प्रेसबिटेरियन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Leave a Comment