पंचायत समिती सदस्याची हत्या

muder
सोलापूर – सोलापूर पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे यांचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सोलापूरातील कुंभारी भागातील ही घटना घडली आहे. गुरुनाथ कटारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंचायत समितीत निवडून आले होते. काल रात्री साडेनऊच्या सुमारास कुंभारी भागातल्या अक्कलकोट रोडवर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राजकीय द्वेषापोटीच कटारे यांची हत्या झाल्याचा आरोप कटारे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर झालेल्या या हत्याकांडाने सोलापूरमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment