१६ ऑक्टोबरला पोर्टेबल भविष्य निर्वाह निधी खात्याचा शुभारंभ

epfo
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑक्टोबर रोजी पोर्टेबल भविष्य निर्वाह निधी खात्यासहित कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना आणि एक संयुक्त वेब पोर्टलचा शुभारंभ करणार आहेत. ज्यामध्ये कामगार कायद्याचे पालन करण्याच्या संदर्भातील मुद्यांच्या आधारे संबंधित कार्यालयांची चौकशी केली जाऊ शकते.

कामगार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, पंतप्रधान १६ ऑक्टोबर रोजी कामगारांसाठी विविध योजना सुरू करण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील. यामध्ये कर्मचारी भविष्य निधी संघटना ग्राहकांसाठी स्वतंत्र खाते संख्या (यूएन) आणि संबंधित कार्यालयांच्या केंद्रीय पडताळणीसाठक्ष एका वेब पोर्टलचा समावेश आहे. याशिवाय कामगार मंत्रालयाद्वारे औद्योगिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांतर्गत अशा संस्थांकडून उत्तीर्ण आणि विविध कंपन्यांतील प्रमुख पदावर असलेल्या काही व्यक्तींना सन्मानित केले जाणार आहे. अधिका-याने असेही सांगितले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची ब्रॅंडिंग झालेली नाही. यासाठी मंत्रालयाने या व्यक्तींची ओळख आपल्या प्रशिक्षण संस्थांच्या बॅंड ऍम्बेसेडरच्या रूपात करून दिली आहे. यामुळे या संस्थांची सकारात्मक ब्रॅंडिंग होईल. जेणेकरून लोक यामध्ये नोंदणी करतील आणि पहिला पर्याय म्हणून याला पसंती देतील. सध्या अभियंता बनण्याच्या इच्छेसाठी आयआयटी, एनआयटी आणि विविध खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्राधान्य दिले जाते आणि आयटीआयला अखेरचा पर्याय म्हणून पाहिले जाते. स्वतंत्र खाता संख्येवर पोर्टेबल होणा-या सदस्यांना संपूर्ण कामकाज सुरळीत चालण्यासाठी उपयोग होईल आणि याचा भारतात कोठेही वापर केला जाऊ शकतो.

Leave a Comment