स्नोडेन आणि मैत्रिण लिडसे रशियात एकत्र

snowden
मास्को – अमेरिकी राष्ट्रीीय सुरक्षा यंत्रणेचा गुप्त टेहळणी कार्यक्रम जगासमोर आणणारा व्हीसल ब्लोअर एडवर्ड स्नोडेनची मैत्रिण पोलर डान्सर लिंडसे मिल्स रशियात स्नोडेनसोबत राहण्यासाठी पोहोचली असून हे दोघेही मास्कोत चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून आले आहेत. अमेरिकेने स्नोडेनला देशद्रोही घोषित केल्यानंतर स्नोडेन अमेरिकेतून फरारी झाला आहे आणि सध्या तो रशियात राहात आहे.

स्नोडेनच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार २००९ पासून स्नोडेन आणि लिंडसे एकत्र राहात होते पण अमेरिकेतून स्नोडेनने पलायन केल्यानंतर त्याच्या या मैत्रिणीचा ठावठिकाणा कळत नव्हता. ते दोघे वेगळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र जुलैपासून लिंडसे स्नोडेनसोबत राहत असून तिच्याकडे कायमस्वरूपी व्हिसा नसल्याने ती सतत त्याच्याबरोबर राहू शकली नव्हती.

विशेष म्हणजे स्नोडेनवर बनलेल्या डॉक्युमेंटरी २४ आक्टोबरला प्रदर्शित होत असतानाच स्नोडेनच्या वकीलांनी वरील खुलासा केला आहे. लॉरा पोयट्रस यांनी स्नोडेनवर बनविलेल्या २ तासांच्या डॉक्युमेंटरीमध्ये स्नोडेन हाँगकाँगमध्ये पत्रकारांशी बोलत असताना लिंडसे स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असल्याचे दाखविले गेले आहे.

Leave a Comment