रेडबूलला भरावा लागला भूर्दंड

redbull
वॉशिंग्टन – चुकीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल रेडबूल या शीतपेय निर्मात्या उद्योगाला अमेरिकेत १३ दशलक्ष डॉलर्सच्या नुकसान भरपाईच्या दाव्याला तोंड द्यावे लागले आहे. रेडबूल प्यायल्यानंतर ग्राहकांना पंख फुटुन ते उडायला लागतात, असे जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने कंपनीच्या या जाहिरातीवर आक्षेप घेऊन redbull gives you wings या शब्दांना हरकत घेतली आहे. रेडबूलनेदेखील या दाव्यातील भलीमोठी दंडाची शक्यता लक्षात घेऊन जाहिरातीत चूक झाल्याचे मान्य केले आहे. याशिवाय लाखो ग्राहकांना विकल्या जाणा-या उत्पादनाच्या विक्रीत घट होण्याचा धोका लक्षात घेऊऩ, १० डॉलर रोखीने परत किंवा १५ डॉलरचे रेडबूलचे उत्पादन घेतल्यानंतर एक उत्पादन मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. युरोपमध्ये रेडबूलच्या ज्या ग्राहकांना अशा प्रकारे योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांना २ मार्चपर्यंत एका संकेतस्थळावर अर्ज भरुन देण्याचे आवाहन रेडबूलने केले आहे. युरोपमधील रेडबूलच्या उत्पादकांनी म्हटले आहे की, न्यायालयातील हा दावा अमेरिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ अमेरिकेतील ग्राहकांसाठीच ही योजना लागू करण्यात येत आहे.

Leave a Comment