बालेकिल्ल्यात खडसेंना खडे बोल

uddhav-thackrey
मुक्ताईनगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगरमध्ये जो एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तेथेच खडे बोल सुनवले असून गोरगरिबांचे प्रश्न उपस्थित करणे हे विरोधी पक्षनेत्याचे काम आहे. मात्र, पदावर असताना खडसे यांनी गरिब जनतेच्या प्रश्नांना बगल दिली. खडसे यांच्या मतदारसंघातील जनतेवर अन्याय होत आहे. बरे झाले युती तुटली, नाहीतर जनतेवर होणा-या अन्यायाला वाचा फुटली नसती.

एकनाथ खडसे हेच २५ वर्षांच्या युतीचे मारेकरी असून त्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. जनतेचा हा संताप मतपेटीतून उतरायला हवा. येथे रस्ते, पाणी आणि वीजेची कमतरता असल्याचे सांगत, व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये मांडलेल्या मुद्दय़ांचा त्यांनी उल्लेख केला. उंदीर म्हणून हेटाळणी करणा-यांना धडा शिकविण्यासाठी माझी वाघनखे तयार असल्याचे ठाकरे म्हणाले. दिल्लीपूढे शेपूट हलविणा-यांच्या हाती महाराष्ट्र न देण्याचे आवाहन त्यांनी केले.