पाकमधील विशाल जामिया मशीद सर्वांसाठी खुली

jama
लाहोर- पाकिस्तानातील तीन मंबरची मोठी मशीद भाटिया टाऊन जामिया मशीद रविवारी सर्व जनतेसाठी खुली करण्यात आली. या मशिदीच्या उभारणीसाठी १०० कोटी रूपये खर्च केले गेले असल्याचे समजते. देशातील बादशाही मशीद व फैजल मशिदीनंतर ही तिसरी मोठी मशीद आहे.

या मशिदीच्या मुख्य हॉलमध्ये २५ हजार जणांची व्यवस्था होते तर या मशिदीची एकूण क्षमता ७० हजार लोकांची आहे. मशिदीला २१ घुमट आहेत आणि तिच्या मिनारांची उंची आहे १६५ फूट. या मशिदीच्या वास्तूकारांपैकी एक असलेल्या नैयर अली दादा यांनी ही मशिद पाकिस्तानातील सर्वात मोठी मशीद असल्याचा दावा केला आहे मात्र पुरातत्व विभाग तज्ञ मकसूद अहमद यांनी मोठेपणात या मशिदीचा नंबर बादशाही आणि फैजल मशिदीनंतर लावला आहे. ते म्हणाले देशाचा विशाल मशिदींतील ही एक सुंदर भेट आहे कारण लाहोर आणि आसपासच्या शहरातील ऐतिहासिक बाबी लक्षात घेऊन तिचे डिझाईन केले गेले आहे.

Leave a Comment