आपल्या सुहृदांची स्मृती जपा हिर्‍यामधून

diamond
आपले सुहृद देवाघरी गेले की त्यांची स्मृती फोटो, एखादी वस्तू यांच्यासोबत जपली जाते. अंतिम संस्कारांनंतर मृत व्यक्तीची रक्षा नदीत प्रवाहीत करण्याची प्रथा अनेक देशांतून आहे. आता ही रक्षा स्मृती म्हणून आपल्यासोबत ठेवणे शक्य झाले असून ही रक्षा हिर्‍याच्या स्वरूपात जवळ ठेवता येणार आहे. रिनाल्डो विल्ली या स्वित्झरर्लंडमधील संशोधकाने मानवी रक्षेपासून हिरे बनविण्याची कला साध्य करून घेतली आहे. आणि आता त्याने स्वतःची कंपनीच उघडली असून तिचे नांव आहे एलगॉरडॅजा याचा हिंदीतील अर्थ आहे – यादें

विशेष म्हणजे दरवर्षी रिनाल्डोकडे अशा प्रकारे ८५० हिरे बनवून देण्याची कामे येत आहेत. हिरा केवढ्या आकाराचा बनेल त्यावर किंमत ठरविली जाते व ती साधारण ३ लाखांपासून १५ लाखांपर्यंत येते. शाळेत रिनाल्डोच्या वाचनात भाजीपाल्यापासून हिरा कसा बनविता येतो यावरचा लेख आला होता. त्याने त्याचा पाठपुरावा करून शिक्षकांकडून अधिक माहिती घेतलीच पण लेखाच्या लेखकाची भेट घेऊन प्रयोगशाळेत प्रयोग सुरू केले आणि त्यातून त्याला यश मिळाले.

यात मानवी रक्षा प्रयोगशाळेत विशिष्ट तापमानाला तापवून त्यातून कार्बन वेगळा केला जातो. अति उच्च तापमानात त्यापासून ग्रॅफाईट मिळविले जाते हे ग्रॅफाईट पृथ्वीखाली हिर्‍यांच्या खाणीत जसे वातावरण असते त्या वातावरणात एका मशीनमध्ये ठेवले जाते. कांही महिन्यांनंतर त्यापासून हिरा तयार होतो. हा सिंथेटिक हिरा आणि खरा हिरा यातील फरक ओळखणे अतिशय अवघड आहे आणि प्रयोगशाळेत कांही रासायनिक क्रिया केल्यानंतरच सिंथेटिक हिरे ओळखता येतात असेही समजते.

Leave a Comment