अन्य बॅंकांच्या एटीएममधून फक्त पाच वेळा मोफत व्यवहार

atm
मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने‘एटीएम’च्या वापराबद्दल काही नियम बदलले आहेत. तसेच या नियमांमध्ये सुस्पष्टताही आणली आहे. आरबीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या आपल्या परिपत्रकात याबद्दलचे नियम स्पष्ट केले आहेत.बदललेल्या नियमानुसार, जर एखाद्या ग्राहकाने एका महिन्याच्या कालावधीत सहा मेट्रो शहरांसहित दुसऱ्या शहरांत दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून व्यवहार केला. तर त्याला पाच वेळा मोफत व्यवहार करता येणार आहे. यामध्ये फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल दोन्ही पद्धतीच्याव्यवहारांचा समावेश असेल.हे बदललेले नियम १ नोव्हेंबर २०१४ पासून सहा मोठ्या शहरांत लागू होतील. यामध्ये मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे.

आतापर्यंत मेट्रो शहरांमध्ये कोणत्याही ग्राहकाला दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून केवळ तीन वेळा रक्कम काढणे मोफत होते. १४ ऑगस्ट रोजी आरबीआयने हा नियम लागू केला होता. मात्र आता रिझर्व्ह बँकेने जाहिर केलेल्या नियमांप्रमाणे, मेट्रो शहरांत केवळ तीनव्यवहार मोफत मिळतील. तीन पेक्षा अधिक व्यवहारांसाठी २० रुपये दरानेशुल्क आकारले जाईल. जर एखाद्या ग्राहकाने याशिवाय मेट्रो शहरांव्यतिरिक्त एटीएममधून व्यवहार केले. तरच त्याला इतर दोनव्यवहार मोफत मिळतील. यापद्धतीने कोणत्याही ग्राहक मेट्रो शहरांच्या एटीएममधून तीन, तर मेट्रो शहरांव्यतिरिक्त एटीएममधून दोनव्यवहार असे एकूण पाचव्यवहार मोफत मिळणार आहेत. याशिवाय, बँकेला हवे असेल तर ते आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी इतर बँकेत पाचपेक्षा जास्त व्यवहार किंवा मोफत वापराची सुविधा देऊ शकतात.

Leave a Comment