अंबानींची तिसरी पिढी व्यवसायात सक्रीय

amabani
मुंबई – अंबानी कुटुंबियांची तिसरी पिढी आता रिलायन्स उद्योगसमूहात सक्रीय झाली आहे. मुकेश आणि निता अंबानी यांच्या आकाश आणि इशा या मुलांनी रिलायन्सच्या उद्योगसमूहात प्रवेश केला आहे. इशाला रिलायन्स जीओ इन्फोकॉम आणि आकाशला रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आले आहे. कंपनीने एक परिपत्रक जारी करून यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. या दोघांशिवाय नेटवर्क-१८चे नवनिर्वाचित अध्यक्ष अदिल झैनुलभाई यांचा देखील रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.

इशा अंबानी हिने अमेरिकेतील येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशियाई परराष्ट्र व्यवहार या विषयांत पदवी शिक्षण घेतले आहे. याशिवाय तिने न्यूयॉर्कच्या मॅकेन्झी कंपनीत काही दिवस बिझनेस ऍनालिस्ट म्हणून काम देखील केले आहे. तर आकाश अंबानीने ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविली असून रिलायन्स जिओच्या स्थापनेपासूनच तो या कंपनीत सक्रीय आहे. या दोघांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आल्याने अंबानी परिवाराची तिसरी पिढी आता रिलायन्स उद्योग समूहाचा कारभार सांभाळण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Comment