`हुदहुद’ वादळामुळे भारत-वेस्ट इंडिज सामना रद्द

cricket1
नवी दिल्ली – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात उद्या (मंगळवार) विशाखापट्टणम येथे होणारा तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना हुदहुद वादळाच्या प्रकोपामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघ दिल्लीतच विश्रांती घेतील. वादळाच्या प्रकोपामुळे जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. परिणामी आंध्र क्रिकेट संघ (एसीए) वीडीसीए क्रिकेट मैदान देखील खेळण्यासाठी उपयुक्त राहिलेले नाही. या संदर्भात बीसीसीआयने एसीएला सूचित केले आहे. भारतीय संघाचे प्रसिद्धी अधिकारी सीआर मोहन यांनी सांगितले की, आम्ही सद्यस्थितीबाबत बीसीसीआयला सूचित केले आहे. हवामानाची खराब स्थिती पाहता सामना होणे अशक्य आहे. काल दुपारी ताशी १५० किमी या वेगाने हवा सुरू असतांना मैदानावरील आच्छादन देखील उडून गेले. अशा स्थितीत मैदानाचे नुकसान झालेले आहे. मैदानातील कर्मचा-यांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सामान खेळणे शक्य नाही.

Leave a Comment