हसन मुश्रीफ अडचणीत येण्याची शक्यता

hasan
कोल्हापूर – विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ काही तास शिल्लक असतानाच राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मुश्रीफ यांच्या राहत्या घराच्या पत्त्यावर विविध आडनावांची तब्बल ७६ लोक राहत असल्याचे उमेदवार यादीतून उघड झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परशुराम तावरे हे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अतीसंवेदनशील मतदारसंघ म्हणून कागल मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ करत आहेत. मात्र मुश्रीफ ज्या ठिकाणी राहत आहेत. त्याच पत्यावर तब्बल ७६ लोक राहत असल्याचे उघड झाले आहे. या पत्त्यावर राहणाऱ्या लोकांमध्ये बहुतांश मुस्लिम समाजाचे लोक आहेत. तर एक व्यक्ती हा हिंदू समाजातील आहे. यामध्ये कोल्हापुरे, मकानदार, शरीफ मसलत, शेख, जमादार, पिंजारे, पिरनजादे, महात, मुल्ला, मुल्लानी, सनदी, अशा विविध आडनावांचे व्यक्ती मुश्रीफ यांच्या घराच्या पत्त्यावर राहात असल्याचे समोर आले आहे. याला विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ही चूक निवडणूक आयोगाची की मुश्रीफांची आहे, हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे महायुतीचे उमेदवार परशुराम तावरे यांनी सांगितले.

Leave a Comment