सर्वात मोठ्या अंड्याचा लिलाव

egg (1)
लंडन – जगातील सर्वात मोठ्या अंड्याचा लिलाव ब्रिटनमध्ये होत असून या अंड्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी खूपच मोठ्या प्रमाणात उत्साह दाखविला असल्याचे समजते. डायनोसॉरही थक्क होऊ शकेल इतक्या मोठ्या आकाराचे हे अंडे असून ते एलिफंट बर्डचे असल्याचे सांगितले जात आहे.

दोनशे वर्षांपूर्वी आफ्रिकेतील मादागास्कर येथे एलिफंट बर्डची अंडी सापडत असत. ही जात आता नामशेष झाली आहे. सध्या लिलावात विक्रीसाठी आलेल्या या अंड्याला किमान ५० हजार पौंडांची किमत मिळेल असा अंदाज लिलावकर्ते व्यक्त करत आहेत. या अंड्याचा आकार खूपच मोठा असून ते शहामृगाच्या अंड्याच्या सातपट, कोंबडीच्या अंड्याच्या १०० पट तर हमिंग बर्डच्या अंड्याच्या १२००० पट मोठे आहे.

Leave a Comment