विधानसभा निवडणूकीसाठी पुणे जिल्ह्यात पाच हजार पोलीस तैनात

pune-police
पुणे – आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच ग्रामीण पोलिसांनी आत्तापर्यंत साडेपाच कोटी रुपयांची रोकड, सहा हजार लीटर बेकायदा दारू आणि एक लाख लीटर रसायन जप्त केले असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज लोहिया यांनी दिली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत तीन हजार ४५० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यांपैकी एकही मतदान केंद्र पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील नसले तरी या प्रत्येक केंद्रावर पोलीस कर्मचारी असणार आहे. प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये मतदानाच्या दिवशी जिल्हा अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, विजयकुमार मगर यांच्यासह उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी असा एकूण दोन हजार ४५० पोलिसांची फौज बंदोबस्तासाठी असणार आहे. याशिवाय एक हजार होमगार्ड, एक हजार ८०० पोलीस कर्मचारी आणि एक अतिरिक्त अधीक्षक असे २ हजार ८०० पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ मदतीसाठी उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment