मार्क झुकेरबर्ग- नरेंद्र मोदी भेट

modi
फेसबुक सोशल साईटचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी दिल्लीत भेट होऊन त्यात परस्पर सहकार्याच्या अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

या भेटीत फेसबुकचा वापर कोणकोणत्या क्षेत्रांसाठी आणि किती पद्धतीने करता येईल यावर चर्चा झाली तसेच झुकेरबर्गने भारत सरकारबरोबर काम करण्यास फेसबुक उत्सुक असल्याचेही सांगितले. पंतप्रधानांनी यावेळी मानवतावादी सेवाकार्यात जोडलेल्या अधिकाधिक लोकांपर्यंत फेसबुकच्या माध्यमातून कसे जोडले जाता येईल यासंबंधी झुकेरबर्गशी चर्चा केली तर मार्कने फेसबुक आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रात भारतात काम करू इच्छित असल्याचे सांगितले. स्वच्छ भारत अभियानासाठी फेसबुक मोबाईल अॅप तयार करून लवकरच ते उपलब्ध करून देईल असेही मार्कने सांगितले.

डिजिटल इंडिया बाबत अधिक औत्सुक्य दाखविताना झुकेरबर्गने पंतप्रधानांना या विषयात फेसबुक आपली कोणती मदत करू शकते आणि या कामी प्रत्यक्ष सहभागी होऊ शकते ती क्षेत्रे सांगा अशी विनंती केली तर त्याचवेळी पंतप्रधानांनी त्यांना फेसबुकचा वापर दहशतवादी संघटना सदस्य भरतीसाठी करत आहेत ही दुर्देवाची बाब असून हा प्रकार कसा थांबविता येईल याचा विचार केला गेला पाहिजे असे सांगितले. मोदींनी सोशल मिडीयाचा वापर ते गुजराथचे मुख्यमंत्री असताना प्रचार मोहिमात खपच चांगल्या प्रकारे केला गेला असेही सांगितले आणि भारताचे संपन्न पर्यटन क्षेत्र फेसबुकच्या माध्यमातून जगात प्रमोट केले जावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Leave a Comment