कैरेबियन खेळाडूंना मदत करणार बीसीसीआय…

bcci
नवी दिल्ली – बीसीसीआयने पाहुण्या वेस्टइंडिज संघातील खेळाडूंना विश्वास दिला आहे की, त्यांच्या वेतनाबाबच्या मुद्दयावर मार्ग काढण्यासाठी बोर्ड डब्ल्यूआयसीबी सोबत चर्चा करेल. वेस्टइंडिज संघाने पहिल्याच एकदिवसीय सामन्याआधी बहिष्काराची धमकी दिली होती. मात्र, असे असले तरी, अजूनही धोका टळला नसून, जोपर्यंत याविषयावर समाधानकारक तोडगा निघत नाही. तोपर्यंत केव्हाही कठोर पाऊले उचलण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका बाधित होऊ नये म्हणून बीसीसीआयने मध्यस्थी करण्याचे ठरविले आहे. बीसीसीआचे सचिव संजय पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार नियोजित कार्यक्रमानुसार सामने पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मालिका संपल्यानंतर बीसीसीआय डब्ल्यूआयसीबीसोबत चर्चा करेल. दरम्यान डब्ल्यूआयसीबीने आपल्या खेळाडूंना व्यावसायिकतेचे वर्तन करून सामना खेळल्याबद्धल धन्यवाद दिले आहे. वेस्टइंडिज भारत संघासोबत पाच एकदविसीय, एक टी-२० आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे. डब्ल्यूआयसीबीने खेळाडूंच्या तक्रारींवर लक्ष देण्याबाबत आपण विचार करू असे म्हटले असले तरी, खेळाडूंनी अद्याही त्याबाबत नेमकी भुमिका स्पष्ट केलेली नाही.

Leave a Comment