नासाकडून चंद्रावर पाण्याची शोधमोहिम सुरू

nasa
वॉशिंग्टन – मंगळयान यशस्वी झाल्यानंतर आता नासाने चंद्रावर मानवी वसाहत निर्माण करण्याच्या दृष्टीने नासाने हालचाली सुरू केल्या आहेत. भविष्यात चंद्रावर मानवी वसाहतीच्या दृष्टीने पाण्याच्या स्त्रोताचा शोध घेणे गरजेचे असल्याने नासाने आपल्यापरिने अभ्यास सुरू केला आहे. लूनार फ्लॅशलाईट आणि द रिसोर्स प्रॉस्पेक्टर मिशन नावाचे दोन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या प्रकल्पांद्वारे २०१७ आणि २०१८ साली खोदकामाची शक्यता पडताळून पाहण्यात येणार आहे. लूनार फ्लॅशलाईट चंद्रावरील विवरांमध्ये पाण्याच्या साठ्याचा शोध आणि प्रमाण याचा तपास करणार आहे.

याशिवाय रिसोर्स प्रॉस्पेक्टर मिशन चंद्रावर रोवर पाठवण्याची योजना आखते आहे. रोवर चंद्राच्या पुष्ठभागावर खोदकाम करुन एक मीटरपर्यंत पाण्याचे नमूने गोळा करण्याची कामगिरी करेल. लूनार फ्लॅशलाईट कमी उंचीवरुन चंद्राच्या भोवती ८० वेळा फेऱ्या मारेल आणि पाण्याच्या साठ्याचा शोध घेईल. नासाच्या अलबामा येथील मार्शल स्पेस फ्लाईट सेंटर बार्बरा कोहेन म्हणाल्या कि, चंद्रावर माणसाला पाण्याची नितांत गरज भासेल आणि त्यामुळेच पृथ्वीवरुन घेऊन जाण्यापेक्षा तिथे पाण्याचा शोध घेणे हे खूप उपयुक्त ठरले, असेही ते म्हणाले.

Leave a Comment