तळीरामांची एकाच आठवड्यात होणार चार दिवस पंचाईत

dry-day
मुंबई – एक अतिशय महत्वाची बातमी आहे ती फक्त तळीरामांसाठी. या महिन्यात एकूण पाच ड्राय डे असून, त्यातील तीन तर पुढच्या एकाच सप्ताहात असतील. निवडणूकीच्या कालावधीमुळे या दिवशी राज्यात दारूविक्री बंद राहणार आहे.

राज्यात १५ तारखेला मतदान होत आहे. त्यामुळे १३ तारखेच्या संध्याकाळी पाच वाजेपासूनच राज्यातील सर्वच देशी-विदेशी वाईन शॉप आणि बार बंद राहणार आहेत. १४ ऑक्टोबरला संपूर्ण दिवस, तर मतदानाच्या दिवशी म्हणजे १५ ऑक्टोबरला पाच वाजेपर्यंत ड्राय डे असेल. त्यानंतर मात्र तळीरामांना संधी मिळणार आहे.

तसेच राज्यातील निवडणूकीच्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच १९ ऑक्टोबर रविवारी संपूर्ण दिवस राज्यातील सर्व देशी-विदेशी मद्यांची दुकाने आणि बार बंद असतील. निवडणूकीच्या कालावधीत होणाऱ्या भांडणं आणि मारामाऱ्या या सर्वांच्या पार्श्वभुमीवर सगळ्याच निवडणूकींच्या मतदानाच्या आणि मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे असतो.

Leave a Comment