कुलदीप यादव उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाचा ‘राजदूत’

kuldeep
कानपुर – १९ वर्षाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने आतापर्यंत एकही प्रथमश्रेणी सामना खेळला नाही. परंतु त्याला आज त्याच्या कनिष्ट पातळीवरील कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघात सामिल करण्यात आले आहे. आतापर्यंत त्याने टीम इंडियामध्ये पदार्पण केले नाही. मात्र, उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाने त्याला राजदूत बनविण्याची तयारी सुरु केली आहे. कानपुरचे जिल्हाधिकारी रोशन जैकब यांनी सांगितले की, कुलदीपला उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाने राज्याचा राजदूत बनविण्याचा प्रस्ताव पाठविला आहे आणि त्याने देखील जवळपास यासाठी सहमती दिली आहे. कागदोपत्री कारवार्इ करणे अजून शिल्लक आहे. कारण, कुलदीप सध्या वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेत व्यस्त आहे. त्यांनी सांगितले की, याप्रकारे आम्ही खेळाव्यतिरिक्त गायन, नृत्य अन्य कलेचा शोध घेत आहोत. कारण, आम्हाला त्यांना राजदूत बनवून मतदार जागरूकतेच्या अभियानात सामिल करायचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Leave a Comment