सीमेवर शांतता राखण्याचे पाकिस्तानी पंतप्रधानांचे आवाहन

nawaz
इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताला लागून असलेल्या सीमेवर शांतता कायम राखण्याचे आणि तीन ऑक्टोबरपासून वारंवार करण्यात येत असलेला गोळीबार थांबवण्याचे आवाहन केले आहे. जम्मू काश्मिर नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांकडून होत असलेल्या गोळीबारानंचर उद्भवलेल्या तणावाबाबत आज राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत बोलताना शरीफ म्हणाले की, पाकिस्तानला शांतता हवी आहे. मात्र याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये. भारताने शस्त्रसंधी कराराचा सन्मान करायला हवा. भारताद्वारे करण्यात आलेल्या गोळीबारात मारले गेलेल्या नागरिकांबाबत शरीफ यांनी दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत पाकिस्तानी गृहमंत्री चौधरी निसार अली खान, संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ, पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र प्रकरणातील सल्लागार सरताज अजीज यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीत लष्कराच्या उच्च अधिका-यांनी त्यांना नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली.

Leave a Comment