रिक्षाचालकांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्न करू – नितेश राणे

nitesh-rane
कणकवली – राज्यातील रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आश्वासन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी दिले. कणकवलीमधील नितेश राणे यांनी रिक्षाचालकांशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

रिक्षाचालक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. दिवसरात्र स्वतःच्या आऱोग्याची पर्वा न करता हा घटक समाजाला सेवा देत असतो, मात्र त्यांचे संपूर्ण आयुष्यच अस्थिर बनले आहे. आरोग्यप्रश्‍नासाठी अवलंबून राहावे लागते. सुरक्षितता नसते, तसेच निश्‍चित असे पार्किंगही उपलब्ध नाही; मात्र पुढील कालावधीत सर्व प्रश्‍न सोडविण्यास स्वाभिमान संघटना काम करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पार्किंगची सोय, वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी, प्रत्येकाचा आरोग्य विमा, तसेच वृद्धापकाळ पेन्शन आदींसाठीची योजना तयार करीत आहोत. आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत कार्यवाही सुरू होईल, असेही ते म्हणाले.मुंबईत आम्ही रिक्षाचालकांचे परमिट आणि पार्किंगची सोय बाबतचे प्रश्न सोडविले आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्गामधील देखील हे प्रश्न देखील सोडविण्याचा प्रयत्न करू, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment