यंदाचे शांततेचे नोबेल भारताच्या कैलाश सत्यर्थी, मलाला युसूफझाईला

nobel
स्टॉकहोम – भारताच्या कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसूफझाईची जागतिक प्रतिष्ठेच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली असून मलाला आणि सत्यर्थी यांनी बाल हक्काच्या गळचेपी विरोधात जो आवाज उठवला. मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याची दखल घेऊन नॉर्वे नोबेल समितीने या पुरस्कारासाठी दोघांची निवड केली आहे.

कैलाश सत्यर्थी यांनी कुठलेही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी विशेष कार्य केले. महात्मा गांधींच्या तत्वाला अनुसरुन त्यांनी वेळोवेळी बालहक्कासाठी शांततामय मार्गाने आंदोलने केली. आर्थिक फायद्यासाठी मुलांच्या होणा-या शोषणाकडे त्यांनी लक्ष वेधले.

मलालाने स्त्री शिक्षणाच्या हक्कासाठी केलेला संघर्षही खूप मोठा आहे. तालिबानी दडपशाहीला न जुमानता तिने शिक्षणाच्या अधिकारासाठी आवाज दिला. तिचा आवाज बंद करण्यासाठी दहशतवाद्यांनी तिच्यावर भ्याड हल्ला केला. तिच्यावर गोळया झाडल्या. मात्र या जीवघेण्या हल्ल्यातून सावरल्यानंतरही मलालाची हिम्मत कुठेही कमी झाली नाही. ती संपूर्ण जगात स्त्री शिक्षणाच्या अधिकारासाठी आवाज उठवत आहे.

Leave a Comment